Join us

मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 07:10 IST

Mumbai : गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी दर अधिक असल्याने मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. यामुळे दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे.

मुंबई : कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्क्यांच्या खाली असल्याने मुंबई निर्बंधांच्या तिसऱ्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यांत आली आहे; मात्र पालिका प्रशासनाने तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी दर अधिक असल्याने मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. यामुळे दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर आणखी कमी होऊन आता ४.४० टक्के एवढा आहे. तर ऑक्सिजन खाटांचे प्रमाण २७.१२ टक्के एवढे आहे. बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे.

मुंबईचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करताना निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेकडे सोपविण्यात आले होते; मात्र मुंबईची भौगोलिक रचना व लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, लोकल ट्रेनमधून दाटीवाटीने प्रवास करणारे लाखो प्रवासी तसेच हवामान खात्याने येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे पालिका प्रशासनाने सध्या असलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या