Join us  

Mumbai Corona Updates: शाब्बास मुंबईकर! कोरोना लढ्यात मोठं यश; २४ तासांत दोन हजारांहून कमी रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 8:04 PM

Mumbai Corona Updates: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं यश मिळालं आहे. कारण गेल्या २४ तासांत मुंबईत केवळ १७९४ रुग्ण वाढले आहेत.

Mumbai Corona Updates: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं यश मिळालं आहे. कारण गेल्या २४ तासांत मुंबईत केवळ १७९४ रुग्ण वाढले आहेत. तर ३ हजार ५८० जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. (mumbai reports 1794 new positive COVID 19 cases)

देशात कोरोना लाटेचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकवेळ मुंबईतही दिवसाला १० हजार रुग्ण आढळत होते. पण आता गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी देखील आता १६३ दिवसांवर गेला आहे.

मुंबईत आज एकूण २३ हजार ६१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून १७९४ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ६ लाख ७८ हजार २६९ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ६ लाख १६ हजार ९९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत एकूण १३ हजार ८९१ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर गेल्या २४ तासांत मुंबईत ७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस