Join us  

Mumbai Rain Updates: मुंबईला येणाऱ्या आणि मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 9:59 AM

अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देधो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे उपनगरीय लोकल सेवा पार विस्कळीत झाली आहे.अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं लांब पल्ल्याच्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात सोमवारी रात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे उपनगरीय लोकल सेवा पार विस्कळीत झाली आहेच, पण मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनानं ट्विटरवरून रद्द झालेल्या आणि अर्ध्या वाटेतूनच परतणाऱ्या गाड्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. 

2 जुलै 2019 : रद्द झालेल्या ट्रेन

50104/50103 रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर22102/22101 मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस12127/12128 मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस17617/17618 नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस12118/12117 मनमाड-एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस11139 मुंबई-गदग एक्स्प्रेस11140 गदग-मुंबई एक्स्प्रेस12110/12109 मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस11010/11009 पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस12124/12123 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन11023 मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस

 

 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबई ट्रेन अपडेट