मुंबई- तरूणाच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वे अपघात
By Admin | Updated: September 20, 2016 18:09 IST2016-09-20T18:09:40+5:302016-09-20T18:09:40+5:30
एका 23 वर्षीय तरूणाच्या सतर्कतेमुळे मुंबईत मोठा रेल्वे अपघात टळला. तरूणाने तुटलेला रेल्वे ट्रॅक पाहिला आणि तात्काळ

मुंबई- तरूणाच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वे अपघात
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.20- एका 23 वर्षीय तरूणाच्या सतर्कतेमुळे मुंबईत मोठा रेल्वे अपघात टळला. तरूणाने तुटलेला रेल्वे ट्रॅक पाहिला आणि तात्काळ त्याची माहिती संबंधितांना दिली त्यामुळे मोठा अपघात होता होता राहिला. गुरूराज साहू सकपाळ असं तरूणाचं नाव असून तो चुनाभट्टी येथे राहतो. गुरूराज इंजिनिअर असून इंडियन रेल्वे फॅन क्लबचा सदस्यही आहे.
'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, गुरूराज सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जात होता. फुटओव्हर ब्रिजवरून जात असताना रेल्वे रूळाला तडा गेल्याचं त्याने पाहिलं. त्यावेळी रेल्वे स्थानकावर लोकल उभी होती. ती लोकल त्याच ट्रॅकवरून जाणार होती. प्रसंगावधान दाखवत धावत जाऊन गुरूराजने मोटरमनला पुढील धोक्याची माहिती दिली. मोटरमन परमहंस आर गिरी यांनी स्वतः जाऊन रूळाची पाहणी केली आणि लागलीच नियंत्रण कक्षाला याबाबत कळवलं . त्यामुळे पुढील संभाव्य धोका टळला. जर गुरूराजने तडा गेल्याची माहिती दिली नसती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.