Join us  

मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला; भाडेवाढ तात्काळ प्रभावानं लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 6:54 AM

खटुवा समितीच्या शिफारशीनुसार तात्काळ भाडेवाढ करण्यात आली लागू.

ठळक मुद्देखटुवा समितीच्या शिफारशीनुसार तात्काळ भाडेवाढ करण्यात आली लागू.

विमानतळाहून आता मुंबई-पुणेटॅक्सी प्रवास महागला आहे. विनावातानुकूलित आणि वातानुकूलित टॅक्सीभाड्यात १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वातानुकूलित टॅक्सीसाठी आता ४२५ ऐवजी ५२५, तर विनावातानुकूलित टॅक्सीसाठी ३५० ऐवजी ४५० रुपये प्रवाशांना मुंबई-पुणे प्रवासासाठी द्यावे लागणार आहे. खटुवा समितीच्या शिफारशीनुसार मुंबई-पुणे टॅक्सीची भाडेवाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे.

खटुवा समितीच्या शिफारशीनुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सीची भाडेवाढ करून प्रतिकिलोमीटर दर १६.९३ रुपये करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मुंबई-पुणे १५५ किलोमीटर अंतराकरिता परिगणना केली असता प्रतिप्रवासी भाडे ६५६ रुपये, तर कुल कॅब टॅक्सी भाडेदरात वाढ करून प्रतिकिलोमीटर २२. २६ करण्यात आले आहे. 

त्याप्रमाणे मुंबई-पुणे १५५ किलोमीटर अंतराकरिता परिगणना केल्यानंतर प्रतिप्रवासी भाडे ८६३ रुपये इतके येणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी प्रतिकिलोमीटर २.९४ रुपये तर कुल कॅबसाठी प्रतिकिलोमीटर ४.८१ रुपये वाढविण्यात आले आहेत. 

टॅग्स :टॅक्सीमुंबईपुणेविमानतळ