Join us  

देशाच्या सुरक्षा दलांमध्ये मुंबई पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका; आत्तापर्यंत ११० कोविडयोद्धे गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 2:59 PM

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांत लॉकडाऊन सुरू आहे, तर इतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध लागू आहेत. कोरोना महामारीत गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाइन योद्धे आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहेत.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांत लॉकडाऊन सुरू आहे, तर इतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध लागू आहेत. कोरोना महामारीत गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाइन योद्धे आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. यात डॉक्टरांसोबतच पोलीस दलाचं योगदान देखील फार मोठं आहे. यात खरंतर मुंबई पोलिसांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. देशाच्या सुरक्षा दलांमध्ये मुंबई पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ११० योद्धे कोरोनामुळे गमावले आहेत. तर महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ४२७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ५४ जणांच्या यंदाच्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला आहे. (Mumbai Police is the worst affected force in the country when it comes to Covid-19 deaths)

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अतिशय भयानक रुप धारण केलं आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचा जीव जात आहेत. रोज नवनवे आकडे समोर येत आहेत. यात मुंबईतील आकडे देखील सर्वाधिक पाहायला मिळाले. मुंबईल पोलीस आपला जीव धोक्यात घालून शहातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पण यात अनेक पोलिसांच्या जीवावर देखील बेतत आहे. ड्युटीवर असताना कोरोनाची लागण होऊन अनेक पोलीस रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. यातील काही जणांना संसर्ग वाढल्यानं जीव गमावण्याची वेळ येत आहे. 

मुंबई पोलीस शहरात गस्त घालणं असो लसीकरण केंद्र असो किंवा मग क्वारंटाइन सेंटर असो अशा सर्व ठिकाणी आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत. यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे कामाचा ताण वाढल्यानं काही पोलिसांना रोज घरी देखील जाता येत नाहीय. लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर देण्यात आलीय त्यामुळे एप्रिल-मेच्या कडक उन्हात त्यांना पहारा द्यावा लागतोय. 

दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील सदस्याला पोलीस दलात नोकरी देण्याचं याधीच जाहीर केलं होतं. पण ही योजना देखील गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून मागे घेण्यात आली आहे.  

टॅग्स :मुंबई पोलीसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस