मुंबई पोलीस म्हणे... कोरोनापासून बचावासाठी हे लिंगोस लक्षात ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST2021-09-02T04:13:17+5:302021-09-02T04:13:17+5:30
मुंबई : चित्रपटातील डायलॉग, वर्तमानातील घडामोडी, गेम्ससह विविध विषयांचा धागा पकडून केलेल्या हटके आणि अनोख्या ट्वीटमुळे मुंबई पोलीस ...

मुंबई पोलीस म्हणे... कोरोनापासून बचावासाठी हे लिंगोस लक्षात ठेवा
मुंबई : चित्रपटातील डायलॉग, वर्तमानातील घडामोडी, गेम्ससह विविध विषयांचा धागा पकडून केलेल्या हटके आणि अनोख्या ट्वीटमुळे मुंबई पोलीस नेहमीच चर्चेत असतात. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असताना मुंबई पोलिसांनी एक इंटरेस्टिंग ट्वीट करत कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी नवीन लिंगोस लक्षात ठेवावे, असे आवाहन केले आहे.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या सीपी मुंबई पोलीस या ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्वीट करण्यात आले आहे. यामध्ये ‘आपल्या दैनंदिन जीवनातील लिंगोसचा अर्थ आता बदलत आहे. कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करायचं असेल तर हे नवीन लिंगोस लक्षात ठेवा म्हणत ‘ओबे प्रोटोकॉल’, ‘प्रिकॉशन ओव्हर व्हायरस’, ‘मास्क इन ॲक्शन’, ‘फर्स्ट पर्सन सेफ्टी’ अशा चार प्रकारचे लिंगोस मुंबई पोलिसांनी शेअर केले आहेत.
यातून कोरोनाच्या नियमांचे प्रत्येकाने पालन करावे, काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा आणि व्यक्तीच्या किंवा स्वत:च्या सुरक्षेला सर्वप्रथम प्राधान्य द्यावे, असा संदेश पोलिसांनी दिला आहे. या लिंगोसच्या आधारे मुंबई पोलीस नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत.
यापूर्वी विनामास्क फिरणाऱ्यांच्या कारवाईची आकडेवारी शेअर करत त्यांनी चिंताही व्यक्त केली होती.