Join us  

Mumbai Police: आता रात्रीच्या गुन्हेगारीला बसणार आळा; मुंबई पोलिसांनी उचलले मोठे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 10:10 PM

Mumbai Police: शहरातील रात्रीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे रात्रीच्या वेळी घडणाऱ्या गुन्ह्यांना मोठा आळा बसेल, असा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे.

मुंबई: शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) एक नवे पाऊल उचलले आहे. पोलिस आयुक्तांनी आता सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना(Senior Police) रात्रीची ड्युटी(Night Duty) करण्याचे निर्देश दिले आहेत.

दर 15 दिवसांनी नाईट ड्युटी करावी लागणार पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आता सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना 15 दिवसांतून एकदा रात्रीची ड्युटी करावी लागणार आहे. यामध्ये सहपोलीस आयुक्त दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

सहआयुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनाही लागूमुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था, गुन्हे, प्रशासन, वाहतूक आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचाही या नाईट ड्युटीच्या आदेशात समावेश करण्यात येणार आहे. या शाखांचे सहआयुक्त देखील गणवेश परिधान करून रात्री ड्युटीसाठी बाहेर पडतील.

रात्रीच्या गुन्ह्यांना आळा बसेलएका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत पूर्वी डीसीपी स्तरावरील अधिकारी कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी नियमितपणे रात्रीची ड्युटी करत असत. आता ती यंत्रणा पुन्हा पूर्ववत होईल. यासंदर्भातील सूचना लवकरच जारी केल्या जातील. असे केल्यास रात्री घडणाऱ्या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल.

टॅग्स :पोलिसमुंबई पोलीस