Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींचे जुनेच फोटो दाखवून तपास, गुन्हे कार्यप्रणाली केंद्राकडे पोलीस ठाण्यांची पाठ!

By मनीषा म्हात्रे | Updated: February 3, 2026 14:14 IST

मुंबई पोलीस दलात गुन्हेगारांचा डेटा अपडेट ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'गुन्हे कार्यप्रणाली केंद्रा'कडे (MOB) अनेक पोलीस ठाण्यांनी अक्षरशः पाठ फिरवली आहे.

मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्यासह संघटित गुन्हेगारी रोखणे आणि गुन्हेगारांची माहिती वेगवेगळ्या तपास संस्थांमध्ये त्वरित देण्याकरिता गुन्हे कार्यप्रणाली केंद्र (एमओबी) तयार करण्यात आले आहे. मात्र, अनेक पोलिस ठाण्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी अनेक प्रकरणांत आरोपीचा जुना फोटो वापरून तपास करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर ओढावली आहे. 

दरम्यान, दोन वर्षांत मालमत्तेसारख्या गंभीर गुन्ह्यात ४,३०९ आरोपींना अटक झाली असून, त्यापैकी १८४ आरोपींचा तपशील ‘एमओबी’कडे पाठविला आहे. २०१८ पासून वेळोवेळी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी नाराजी वर्तवली होती. ‘एमओबी’ अभिलेखावर आरोपीची नोंद ठेवण्यासाठी हिस्ट्रीशीट फॉर्म, चेहरेपट्टी फॉर्म, एफआयआर, अटक पंचनामा, केस डायरी, अंगुलीमुद्रा, तळहाताच्या मुद्रा, फोटो, तसेच सीएआयएस, एमपीआयएसप्रणालीवर माहिती अपलोड करणे बंधनकारक आहे. जेणेकरून पुढील तपासाला त्याची मदत होईल. मात्र, प्रत्यक्षात पोलिस ठाण्यांकडून माहिती पाठवली जात नाही. जर पाठविल्यास कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रतिसाद असमाधानकारक 

२०२४-२०२५ कालावधीत परिमंडळ १ ते १२, तसेच बंदर परिमंडळातील अनेक पोलिस ठाण्यांनी मालमत्तेच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचे अभिलेख अत्यल्प प्रमाणात ‘एमओबी’कडे पाठविले आहेत. कुलाबा, मरिन ड्राइव्ह, दादर, धारावी, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, अंधेरी, कांदिवली, दहीसर आदी प्रमुख पोलिस ठाण्यांचा यामध्ये समावेश आहे. गुन्हे शाखेतील युनिट ११ वगळता इतर युनिट्सकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नसल्याचे पोलिस आयुक्तालयाने नमूद केले.

मुंबई पोलीस: परिमंडळनिहाय 'एमओबी' प्रतिसाद तक्ता

परिमंडळ (Zone)एकूण आरोपीएमओबी (MOB) प्रतिसाद
परिमंडळ १६५
परिमंडळ २२८७
परिमंडळ ३२८०
परिमंडळ ४२२७
परिमंडळ ५६३३१३
परिमंडळ ६८५५२२
परिमंडळ ७७९११०९
परिमंडळ ८२५०
परिमंडळ ९१६७
परिमंडळ १०२५४
परिमंडळ ११२०४१५
परिमंडळ १२१७९
एकूण४,३९२१६१

तातडीने कारवाईचे निर्देश 

संबंधित पोलिस ठाण्यांनी मालमत्तेच्या गुन्ह्यांत अटक आरोपींची संपूर्ण कागदपत्रे तातडीने ‘एमओबी’कडे पाठवावीत, असे आदेश सर्व परिमंडळ उपायुक्तांना देण्यात आले आहेत. अन्यथा भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Police negligence: Old photos used as stations ignore crime database.

Web Summary : Mumbai police stations neglect the Crime Procedure Center (MOB), hindering investigations. Many stations fail to update records, forcing officers to rely on outdated photos. Despite directives, compliance remains low, impacting crime-solving efficiency and potentially leading to serious consequences.
टॅग्स :मुंबईपोलिस