Join us  

दिल्लीत राहणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांचे ई-चलन, पोलीस घेणार शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 3:09 AM

मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया व्यक्तीवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. पण मुंबई पोलिसांनी आता थेट दिल्लीत राहणाºया व्यक्तीच्या मोबाइलवर ई-चलनचा संदेश पाठवला आहे.

मुंबई : मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. पण मुंबई पोलिसांनी आता थेट दिल्लीत राहणाºया व्यक्तीच्या मोबाइलवर ई-चलनचा संदेश पाठवला आहे.दिल्ली येथील अंतर कुमार यांनी याबाबत टिष्ट्वट केले आहे़ त्या मोबाइल क्रमांकावर कोणतीही दुचाकी, चार चाकी वाहन नाही. तसेच मुंबई किंवा महाराष्ट्रात मी कधीही गेलेलो नाही़ परंतु तरीही मला मोबाइल क्रमांकावर मुंबई पोलिसांनी ई-चलनचा संदेश पाठविला असल्याचे कुमार यांनी नमूद केले. आपल्याला कोणत्या आधारावर ई-चलन आकारले आहे, असा सवाल कुमार यांनी विचारला आहे. ज्या व्यक्तीचे नाव वाहन चालक म्हणून लिहिले आहे ते नाव मी पहिल्यांदा ऐकले आहे. मी माझा मोबाइल क्रमांक ९ आॅगस्ट २०१२ पासून बदलला नाही. तर चूक कशी होऊ शकते?पोलिसांच्या या बेजाबदारपणामुळे कित्येक आरोपी सुटतात, अशीही टीका त्यांनी केली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे म्हणाले, याबाबत चौकशी करून कारवाई करावी लागेल, त्यामध्ये या गाडीची कोणत्या तरी व्यक्तीने नोंदणी केली आहे़ त्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक दाखविला आहे. दोन-तीन प्रकारे मोबाइल क्रमांकात चूक होऊ शकते. एक म्हणजे आरटीओ कार्यालयात गाडीची नोंदणी करताना, कधीकधी व्यक्ती मोबाइल क्रमांक पोर्ट करतात, जुनी गाडी एका व्यक्तीच्या नावे असते आणि दुसरा चालवतो. तसेच काही वेळा जाणीवपूर्वक व्यक्ती दुसºयाच्या मोबाइल क्रमांकावर गाडीची नोंदणी करतात. हे तपासून कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.ई-चलन बरोबरच!गाडीवर जे चलन आकारण्यात आले आहे ते बरोबर आहे, ती गाडी मुंबईत असेल त्यामुळेच ई-चलन आकारले आहे. पण डेटाबेसमध्ये गाडी मालकाचा मोबाइल चुकलेला असू शकतो. त्याबाबत तपास करून जी व्यक्ती जबाबदार आहे त्या व्यक्तीला ई-चलन आकारण्यात येईल.- मधुकर पांडे, सह पोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलीस 

टॅग्स :वाहतूक कोंडीवाहतूक पोलीस