Join us

दिशाचा मृतदेह विवस्त्रावस्थेत नव्हता- पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 05:14 IST

कुठल्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून ती व्हायरल करू नका; पोलिसांचे आवाहन

अभिनेता सुशांतसिंहची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले आहे. मात्र या अफवा असून, दिशाचा मृतदेह विवस्त्रावस्थेत नव्हता, अशी माहिती मुंबई पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच कुठल्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून ती व्हायरल करू नका, असे आवाहन त्यांनी केले.दिशाच्या भावी पतीच्या घरी ८ जून रोजी पार्टी होती. पार्टीनंतर मध्यरात्री ३ च्या सुमारास दिशाने आत्महत्या केली. दोन प्रोजेक्टची कामे न मिळाल्याने ती तणावात होती. यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत मालवणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पार्टीला असलेल्या मंडळींसह २० ते २२ जणांचे जबाब नोंदवले आहेत.