Join us  

अमेरिका निवडणुकांच्या आकडेवारीत मुंबई पोलिसांचाही सहभाग, ट्विट व्हायरल

By महेश गलांडे | Published: November 07, 2020 7:06 PM

अमेरिकेतील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी अद्याप सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देअमेरिकेतील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी अद्याप सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

मुंबई - अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे स्पष्ट होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अध्यक्षीय निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर आली असून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीनुसार जो बायडन यांना 264 मते मिळाली असून डोनाल्ड ट्रम्प यांना 214 मते मिळाली आहे. येथील निवडणुकीत विजयासाठी 270 हा मॅजिक फिगर आहे. अमेरिकेतील आकडेवाडीवर सर्वांच्याच नजरा लागल्या असताना आता मुंबईपोलिसांनीही आपला आकडा सांगितलाय.  

अमेरिकेतील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी अद्याप सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र, बायडेन यांनी घेतलेल्या आघाडीमुळे तेच अध्यक्ष होतील, अशी चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्षांना जी सुरक्षाव्यवस्था पुरवली जाते, तशी सुरक्षा बायडेन यांना देण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसच्या अतिरिक्त तुकड्या डेलावेअरला रवाना झाल्या आहेत. सध्या आकड्यांच्या घोळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद अडकले आहे. मुंबई पोलिसांनी या आकडेवारीच्या खेळात उडी घेतली असून मजेशीर ट्विट केलं आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, मुंबई पोलिसांच्या ट्विटवर मजेशीर रिप्लायही येत आहेत. 

मुंबई पोलिसांचा 100 हा संपर्क क्रमांक असून नागरिकांच्या मदतीला पोलीस तत्काळ हजर होतात. त्यामुळे, बायडन यांना 264, ट्रम्प यांना 214 असं असले तरी मुंबई पोलीस 100 असे म्हणत मुंबई पोलिसांनी सेवेसाठी तत्पर असल्याचं म्हटलंय. तसेच, मुंबई पोलिसांचा हा नंबर कधीच बदलत नाही, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, बायडेन यांची अध्यक्षपदी निवड झाली तरी त्यांचा शपथविधी पुढील वर्षी होईल. २० जानेवारी रोजी होईल. त्यामुळे तोपर्यंत बायडेन यांची सुरक्षाव्यवस्था कडेकोट ठेवली जाईल. ट्रम्प यांनी आडमुठे धोरण अवलंबले असल्याने सत्तांतर सहजासहजी होणार नाही, असे स्पष्ट होत आहे. दरम्यान, डेलवेअर येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बायडेन मोठी घोषणा करणार असल्याचे त्यांच्या प्रचारयंत्रणेमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे त्या परिसरातही सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :अमेरिकामुंबईपोलिसट्विटरनिवडणूक