Join us

मुंबईकरांना कोरोनाचे गांभीर्य नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 14:30 IST

गोरेगाव (पूर्व)हब मॉल मागील असलेल्या आयटी कंपन्या,येथील नागरी निवारा समोरील इन्फिनिटी आयटी पार्क मध्ये निसर्गरम्य डोंगरावर सुमारे 100 हून अधिक आयटी कंपन्या,खाजगी बँका, आस्थापने सुरूच असल्याने येथील कर्मचारी आज जास्त संख्येने कामावर आले.

मनोहर कुंभेजकरमुंबई--राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि मुंबईच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काल महत्वपूर्ण निर्णय जाहिर केले.मात्र मुंबईकर अजूनही कोरोनाबद्धल गंभीर नसल्याचे चित्र आहे.आज उपनगरात रोज कामावर जाणारा चाकरमानी रेल्वे, बस,रिक्षा पकडून कामावर गेला.आजपासून सरकारी कार्यालयांत 50 टक्के कर्मचारी कामावर असतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.मात्र अनेक खाजगी आस्थापने,आयटी कंपन्या सुरच असल्याचे आजचे चित्र आहे.

गोरेगाव (पूर्व)हब मॉल मागील असलेल्या आयटी कंपन्या,येथील नागरी निवारा समोरील इन्फिनिटी आयटी पार्क मध्ये निसर्गरम्य डोंगरावर सुमारे 100 हून अधिक आयटी कंपन्या,खाजगी बँका, आस्थापने सुरूच असल्याने येथील कर्मचारी आज जास्त संख्येने कामावर आले.मालाड पश्चिम येथील माईंडस्पेस,वर्सोवा लिंक रोड येथील अनेक खाजगी आस्थापने सुरूच होती.

गोरेगाव (पूर्व) नागरी निवारा 1-2 येथे 646 वातानुकूलीत बसचा गारेगार प्रवास करण्यासाठी या बसेस भरून प्रवाश्यांना घेऊन जात होत्या.येथील शेयर रिक्षातून माणशी 20 रुपये देऊन येथील नागरिक गोरेगाव स्टेशनला जात होते.तर रस्त्यावर रिक्षा देखिल मोठ्या प्रमाणात धावत होत्या.

 येथील नागरिक रोज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करत होते.त्यामुळे कोरोनाच्या महामारीचा तसा परिणाम मुंबईकरांमध्ये जाणवत नसल्याचे चित्र आहे.कोरोनासे हम नही डरेंगे असाच काहीसा पवित्रा मुंबईकरांचा असल्याचे आजचे चित्र आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरून काम करा अश्या सूचना दिल्या असतांना अनेक आस्थापने सुरूच असल्याने रेल्वे,बस व मेट्रो,बँका मध्ये गर्दी दिसत होती.शासनाचा आदेश खाजगी कंपन्या पाळत नाही अशी तक्रार येथील कर्मचाऱ्यांनी केली.त्यामुळे होणाऱ्या गर्दीवर कसे नियंत्रण ठेवायचे हा मोठा प्रश्न महाआघाडीच्या सरकार समोर आहे.

कांदिवली (पूर्व) अशोक नगर येथील कादंबरी सोसायटीमधील काही कुटुंब दुबई,सिंगापूर येथून गेल्या शुक्रवारी येथे परत आले.मात्र परदेशवारी करून आलेल्या नागरिकांनी किमान 15 दिवस तरी घराबाहेर पडू नका अश्या सूचना शासनाने दिल्या असतांना येथील नागरिक मात्र सर्वत्र फिरत असल्याने या परिसरातील नागरिकांना कोरोनाचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस