मुंबईत तापाचे रुग्ण वाढले

By Admin | Updated: September 17, 2014 00:49 IST2014-09-17T00:49:52+5:302014-09-17T00:49:52+5:30

सप्टेंबर महिन्यात गणपतीच्या आगमनापासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली होती. सप्टेंबरच्या दुस:या आठवडय़ात पाऊस कमी झाला.

In Mumbai, patients with fever increased | मुंबईत तापाचे रुग्ण वाढले

मुंबईत तापाचे रुग्ण वाढले

मुंबई : सप्टेंबर महिन्यात गणपतीच्या आगमनापासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली होती. सप्टेंबरच्या दुस:या आठवडय़ात पाऊस कमी झाला. मात्र अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झालेला दिसून आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुस:या आठवडय़ामध्ये मुंबईत तापाचे 2 हजार 327 रुग्ण आढळून आले आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तापाचे 1 हजार 895 रुग्ण आढळले होते. आतार्पयत सप्टेंबरच्या दोन आठवडय़ांत मिळून तापाचे 4 हजार 222 रुग्ण आढळून आले आहेत. मलेरियाच्या रुग्णांमध्येही दुस:या आठवडय़ात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पहिल्या आठवडय़ात 245 रुग्ण तर दुस:या आठवडय़ात 299 रुग्ण आढळले आहेत.
ऑगस्ट महिन्यामध्ये डेंग्यूचे 65 रुग्ण आढळले होते. मात्र आता डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ामध्ये डेंग्यूचे 33 तर दुस:या आठवडय़ामध्ये 35 रुग्ण आढळले आहेत. म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्याच्या 2 आठवडय़ांत मिळून 3 जास्त रुग्ण आढळले आहेत. गॅस्ट्रोच्या रुग्णांतदेखील वाढ दिसून येते आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुस:या आठवडय़ात गॅस्ट्रोचे 2क्1 रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: In Mumbai, patients with fever increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.