Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूर, गोवंडीत दोन दिवस पाणी नाही; महापालिकेने केले आवाहन

By जयंत होवाळ | Updated: May 27, 2024 21:52 IST

Water Cut : जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे गोवंडी आणि चेंबूरच्या काही भागात पाणीपुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाशी नाका येथे जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे २९ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३० मे सकाळी १० वाजेपर्यंत गोवंडी आणि चेंबूरच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद राहणार आहे, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

पाणी पुरवठ्यावर परिणाम होणारे विभाग १) एम पूर्व विभाग (बीट क्रमांक १४७ ते १४८)* – लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, एच. पी. सी. एल. वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, बी. ए. आर. सी., वरुण बेवरेजेस ( २९ मे रोजी सकाळी १० ते ३० मे सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील). २) एम पश्चिम विभाग (बीट क्रमांक १५४ ते १५५)- माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका मैसूर वसाहत, खाडी मशीन, आर. सी. मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक चेंबूर छावणी ( २९ व ३० मे पाणीपुरवठा बंद राहील)

टॅग्स :मुंबईपाणीकपात