Join us

मुंबई-नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 08:58 IST

मुंबई टॅक्सी संघटनेकडून काही मागण्या करण्यात आल्या होत्या.

मुंबई : मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गांवर धावणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी व निळ्या-सिल्व्हर वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यासाठीची मान्यता मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आली आहे.

त्यानुसार, नाशिकसाठीच्या वातानुकूलित टॅक्सीसाठी १०० रुपये, शिर्डीसाठी २०० रुपये अधिक मोजावे लागतील. तर, मुंबई-पुण्याकरिता वातानुकूलित व साध्या टॅक्सीकरिता ५० रुपये अधिक मोजावे लागतील. 

मुंबई टॅक्सी संघटनेकडून काही मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्या लक्षात घेत खटुआ समितीच्या अहवालानुसार, भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून नवी भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे.

मुंबई-नाशिक वातानुकूलित टॅक्सीआताचे दर    नवे दर४७५ रु.     ५७५ रु.मुंबई शिर्डी वातानुकूलित टॅक्सीआताचे दर    नवे दर६२५ रु.    ८२५ रु.मुंबई - पुणे साधी टॅक्सीआताचे दर    नवे दर४५० रु.    ५०० रु.मुंबई - पुणे वातानुकूलित टॅक्सीआताचे दर    नवे दर५२५ रु.    ५७५ रु.

टॅग्स :टॅक्सीमुंबई