Join us  

मुंबई मनपाचे गणेश गौरव पुरस्कार जाहीर, पंचगंगा मंडळानं मारली बाजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 1:10 PM

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३ स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई-

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३ स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले आहेत. यात प्रथम पारितोषिक पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाला जाहीर झालं आहे. ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (माझगाव) द्वितीय आणि महादेवाची वाडी वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (परळ) तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

मुंबई मनपाच्यावतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३’ या स्पर्धेत लोअर परळ येथील पंचगंगा सार्वजनिक मंडळाने प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) पटकावला. माझगावच्या ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने द्वितीय पुरस्कार (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह) आणि परळ येथील महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तृतीय पुरस्कारावर (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) मोहोर उमटवली. यंदा शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार काजूवाडी येथील श्री गणेश क्रीडा मंडळास तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक श्री. प्रभाकर मुळये (विकास मंडळ साईविहार, भांडूप) यांना तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे पारितोषिक श्री. प्रदीप पंडित (पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) यांना जाहीर करण्यात आले. 

याशिवाय, १४ मंडळांना विशेष प्रशस्तीपत्रकही जाहीर करण्यात आले. गणेशोत्सव सोहळा मुंबई महानगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या माध्यमातून नागरी सेवा-सुविधा तसेच जनहितविषयक संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावेत, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे ३४ वे वर्ष असून या स्पर्धेत ६१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. 

‘श्रीगणेश गौरव स्पर्धा – २०२३’ चा निकाल  

>> प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व)

>> द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताराबाग पटांगण, माझगाव, मुंबई

>> तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गं. द. आंबेकर मार्ग, महादेवाची वाडी, परळ, मुंबई

सर्वोत्कृष्ट मूर्तीकार (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)श्री. प्रभाकर मुळये (विकास मंडळ (साईविहार) भांडूप पश्चिम)

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (सजावटकार) (रु.२०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)श्री. प्रदीप पंडित (पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राणीबागचा राजा)

दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु.१०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)१. बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बर्वेनगर, घाटकोपर (पश्चिम)२. गोकुळनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, गोकुळनगर, रावळपाडा, दहिसर (पूर्व)

शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती  पारितोषिक (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)श्री गणेश क्रीडा मंडळ, जाधव चाळ, काजूवाडी, अंधेरी (पूर्व)

प्‍लास्‍टिक बंदी / थर्माकोल बंदी  / पर्यावरण विषयक जनजागृती उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

१. बालमित्र कलामंडळ (विक्रोळीचा मोरया), विक्रोळी (पश्चिम)२. स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सात बंगला, अंधेरी (पश्चिम)

सामाजिक कार्य / समाज कार्य / अवयवदान जागृतीः पारितोषिक (रु.१५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)विघ्नहर्ता रहिवाशी मित्रमंडळ, चंपाभूवन, बोरीवली (पूर्व)

प्रशस्तीपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळ समाज प्रबोधन:१) गं. द.आंबेकर मार्ग काळेवाडी;२) धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, धसवाडी, ठाकूरद्वार;३) जय हनुमान सेवा समिती, दहिसर (पूर्व)

आरोग्यविषयक जनजागृती: श्री हनुमान सेवा मंडळ, धारावीउत्कृष्ट सजावटकार: श्री साईदर्शन मित्रमंडळ, बोरीवलीउत्कृष्ट देखावा: सुभाषनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, सुभाषनगरस्वच्छता विषयक जनजागृती: सुभाष लेन गणेश साईसेवा मंडळ, कांदिवली (पश्चिम)सामाजिक उपक्रम: पार्क साईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विक्रोळी (पश्चिम) वर्षभर चालणारे आरोग्य उपचार केंद्र: सार्वजनिक गणेशोत्सव समिती विक्रोळी (पूर्व)प्लास्टिकबंदी देखावा: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जंगल-मंगल मार्ग, भांडूप (पश्चिम)उत्कृष्ट मूर्ती: निकदवरी लेन सार्वजनिक गणेश मंडळ, गिरगावसुबक शाडू मूर्ती: श्री अष्टविनायक बाल मित्रमंडळ खारदांडा, खार (पश्चिम)पर्यावरण विषयक जनजागृती: इलेव्हन ईव्हिल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेश मंडळ, धारावीपर्यावरणपूरक: ओम श्री सिद्धीविनायक मित्रमंडळ, अंधेरी (पूर्व)

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई