BMC Employees Diwali Bonus: दिवाळीच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये दोन हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. तसेच बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना पाच हजार रुपये भाऊबीज भेट म्हणून देण्यात येणार आहेत.
महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली २०२५ साठी ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी घोषित केला आहे. १. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/-
२. अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये ३१,०००/-
३. महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये ३१,०००/-
४. माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
५. माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
६. अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
७. अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
८. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये १४,०००/-
९. बालवाडी शिक्षिका / मदतनीस - भाऊबीज भेट रुपये ०५,०००/-