Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai BMC Mayor: मुंबईचा महापौर कोण? सोडत निघाली! मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:20 IST

Mumbai BMC Mayor Reservation: अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद यावेळी कुणाला आरक्षित होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान, सर्वांनाच उत्सुकता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत अखेर जाहीर  झाली आहे.

BMC Mayor Lottery Reservation: अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद यावेळी कुणाला आरक्षित होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान, सर्वांनाच उत्सुकता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत अखेर जाहीर  झाली आहे. आज काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये  मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील  महिलेसाठी आरक्षित झालं आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर आज या महानगरपालिकांमधील महापौरपदासाठीची सोडत काढण्यात आली. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत चक्राकार पद्धतीच अवलंब करण्यात येणार असल्याचे निश्चित झाल्याने मुंबईचं महापौरपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच अनुसूचित जमातीचे दोन्ही नगरसेवक हे उद्धवसेनेकडेच असल्याने महापौरपदाचं आरक्षण या प्रवर्गाला आरक्षित झाल्यास त्याचा फायदा ठाकरेंना होणार असे बोलले जात होते. मात्र आज निघालेल्या सोडतीमध्ये मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालं आहे. मुंबईबरोबरच पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, मीरा भाईंदर, भिवंडी, नाशिक, मालेगाव आणि धुळे या महानगरपालिकांमध्ये महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालं आहे. 

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला बहुमत मिळालं आहे. २२७ नगरसेवक संख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेला मिळून ११८ जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजपाने ८९ तर शिंदेसेनेने २९ जागा जिंकल्या आहेत. तर ठाकरे बंधूंच्या युतीला ७२ जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये उद्धवसेनेला ६५ जागा, शिंदेसेनेला २९ जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला १ जागा मिळाली आहे. याशिवाय काँग्रेसला २४ आणि एमआयएमला ८ जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, मुंबईच् कल्याण डोंबिवलीमध्ये महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालं आहे. तर ठाणे महानगरपालिकेचं महापौरपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Mayor's Post Reserved for Open Category Woman After Draw

Web Summary : Mumbai's mayoral seat is reserved for a woman from the open category. BJP and Shinde's Sena alliance secured a majority in the municipal elections, winning 118 seats. Kalyan Dombivli is reserved for Scheduled Tribes; Thane for Scheduled Castes.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६महापौरमुंबई महानगरपालिका