Join us  

मुंबईकरांनो, रेल्वेने उद्या प्रवास करताय, ‘मेगा ब्लॉक’ पाहूनच नियोजन करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 9:35 AM

रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

Mumbai Mega block update : मध्य रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०:५५  ते दुपारी ३:५५ पर्यंत ‘ब्लॉक’असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:४८  ते दुपारी ३:४९ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांदरम्यान या लोकल थांबतील आणि नंतर त्या डाऊन धीमी मार्गावर वळवण्यात येतील तसेच घाटकोपर येथून सकाळी १०:४१ ते दुपारी ३:५२ पर्यंत  सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर या लोकल थांबतील. मानखुर्द ते नेरुळदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११:१५ ते दुपारी ४:१५ वाजेपर्यंत ‘ब्लॉक’ असेल. 

‘हार्बर’वर मानखुर्द ते नेरूळदरम्यान कामे - हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४:३० या कालावधीत ट्रान्स हार्बर/मुख्य मार्गांवर प्रवास करण्याची मुभा आहे.

डाऊन धीमी लाइन- ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:१८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सायं. ४:०१ वा. डोंबिवलीसाठी सुटणार आहे. 

अप धीमी लाइन -  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ‘ब्लॉक’पूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल.‘ब्लॉक’नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पहिली लोकल ठाण्याहून दुपारी ३:३६ वाजता सुटेल.

डाऊन हार्बर मार्गावर - ‘ब्लॉक’पूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:१४ वाजता सुटेल. वाशीसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:१८ वाजता सुटेल. ‘ब्लॉक’नंतर पनवेलसाठी पहिली लोकल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३:३६ वाजता सुटेल.

अप हार्बर लाइनवर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ‘ब्लॉक’पूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०:३३ वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ‘ब्लॉक’नंतर पहिली लोकल वाशी येथून दुपारी ४:१९ वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ‘ब्लॉक’नंतर पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४:१० वाजता सुटणार आहे.

पश्चिम रेल्वे शनिवार/रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच २ आणि ३ मार्च २०२४ रोजी सांताक्रूझ आणि माहीम स्थानकांदरम्यान रात्री १२:३० ते सकाळी ४:३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ४ तासांचा जंबो ब्लॉक घेतला जाईल, अशी पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

ब्लॉक दरम्यान,  अप स्लो मार्गावरील काही गाड्या अंधेरी आणि चर्चगेट दरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील, त्यामुळे या धीम्या गाड्या अंधेरी-वांद्रे-दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद धावतील. रविवार, ३ मार्च रोजी पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गावर दिवसा ब्लॉक असणार नाही.

टॅग्स :रेल्वेपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे