Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनो, उद्या नियोजन करूनच घराबाहेर पडा, रविवारी मेगाब्लॉक; दहा मिनिटे उशिराने धावणार लोकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 11:04 IST

रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावर देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार, सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० पर्यंत आणि चुनाभट्टी-वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. 

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या कालावधीत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे -

उपनगरीय रेल्वेमार्गावरील रूळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी शनिवारी  मध्यरात्रीनंतर तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

१) पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नाही.

डाऊन धिमी लाईन-

१) ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी ९:५३ वाजता टिटवाळ्यासाठी सुटेल.

२) ब्लॉकनंतर पहिली विशेष लोकल बदलापूरसाठी सीएसएमटी येथून दुपारी ३:०५ वाजता सुटेल.

अप धिमी लाईन-

१) ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल कल्याण येथून सीएसएमटीसाठी सकाळी १०:२५ वाजता सुटेल.

२) ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी ४:१७ वाजता कल्याण येथून परळसाठी सुटेल.

अप हार्बर-

१) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ९:४० वाजता सुटेल.

२) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल.

३) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३:२८ वाजता सुटेल.

४) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी ४:५८ वाजता सुटेल.

सकाळी १०:४३  ते दुपारी ३:४४ वाजेपर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी / सेमी जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे,  कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली स्थानकावर थांबतील. 

धिम्या मार्गावर थांबतील-

डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर थांबतील. सीएसएमटी येथून सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान सुटणाऱ्या / येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवा १० मिनिटे उशिराने धावतील. तर ठाणे लोकल गाड्या अप डाऊन धीम्या मार्गावर धावतील.

डाऊन हार्बर-

१) ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी ११:०४ वाजता सुटेल.

२) गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी १०:२२ वाजता सुटेल.

३) ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल सीएसएमटी येथून दुपारी ४:५१ वाजता सुटेल.

४) ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी येथून दुपारी ४:५६ वाजता सुटेल.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे