Join us

मुंबईच्या महापौरांच्या भावाचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 05:35 IST

शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आठवणीत महापौरांनी एक कविता पोस्ट करून आपल्या भावाला श्रद्धांजली वाहिली

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. गेले काही दिवस मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आठवणीत महापौरांनी एक कविता पोस्ट करून आपल्या भावाला श्रद्धांजली वाहिली. कोरोनाची लागण झालेल्या पत्रकारांच्या संपर्कात आल्याने एप्रिल महिन्यात महापौर पेडणेकर स्वत: होम क्वारंटाइन झाल्या होत्या.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या