मुंबई : वर्सोवा येथे होणाऱ्या अनधिकृत डंपिंगमुळे यारी रोड येथे लगत राहात असलेल्या गृहनिर्माण संस्थाच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची स्थानिकांची तक्रार होती. स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्षात स्थितीची पाहणी करण्यासाठी आज सायंकाळी 4.30 वाजता मुंबईच्यामहापौर किशोरी पेडणेकर यांनी येथे घटनास्थळी भेट दिली. सुमारे 20 मिनिटे महापौर येथे होत्या आणि त्यांनी येथे होत असलेल्या अनधिकृत डंपिंगची पाहणी केली.दोन्ही बाजूंच्या तक्रारी ऐकून महापौरांनी सहाय्यक पालिका आयुक्तांना जागा खाजगी संस्थेची जरी असली तरी तेथे कुठल्याही प्रकारची अनधिकृत डंपिंग येथे होवू देऊ नये, असे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच कंत्राटदाराला १५ दिवसात सगळा कचरा महापालिका सांगेल त्या ठिकाणी नेऊन टाकावा व संबधित संस्थेला यापुढे अशा अनधिकृतपणे कचरा भविष्यात जमा करू नये, येथे अनधिकृत डंपिंग होऊ नये म्हणून सोसायटीने कुंपण बांधावे, त्यांना पालिकेने अनधिकृत डंपिंग होत असल्याबद्धल नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
मुंबई : वर्सोव्यात होणाऱ्या अनधिकृत डंपिंगची महापौरांनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:37 IST
यारी रोड बस डेपो लगत असलेल्या आईस फॅक्टरीच्या आवारात गेले काही महिने अनधिकृत डंपिंग होत आहे.
मुंबई : वर्सोव्यात होणाऱ्या अनधिकृत डंपिंगची महापौरांनी घेतली दखल
ठळक मुद्देयारी रोड बस डेपो लगत असलेल्या आईस फॅक्टरीच्या आवारात गेले काही महिने अनधिकृत डंपिंग होत आहे.