Mumbai BMC Mayor Ritu Tawde: भारतीय जनता पार्टीने नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळवले. सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई पालिकेत भाजपने रितू तावडे यांच्या माध्यमातून पहिली महिला महापौर बसवली. मुंबई महापालिकेत सत्तेवर येताच भाजपाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात महापौररितू तावडे यांनीही महत्त्वपूर्ण निर्णय घेत भेटायला येणाऱ्या मुंबईकरांना खास विनंती केली आहे. मुंबईची महापौर म्हणून मला मिळणारे मानधन मी महापौर निधीस देत असून माझ्यासहीत इतर सर्व नगरसेवकांनी, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापौर निधीस आर्थिक मदत करुन गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेमध्ये खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.
मुंबईकरांना खास विनंती
मुंबईच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईकर नागरिक मोठया प्रमाणात भेटण्यासाठी शाल व पुष्पगुच्छ घेऊन येत असून याऐवजी नागरिकांनी दुर्धर आजारातील गरीब रुग्णांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी महापौर निधीस सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुंबईची महापौर म्हणून मुंबईकर नागरिकांना करीत आहे. यासाठी क्यू आर कोड ची व्यवस्था करण्यात येत असून नागरिका या क्यू आर कोड द्वारे आपली आर्थिक मदत महापौर निधीस देऊ शकतात. महापौर कार्यालयाच्या दर्शनीभागावर हे क्यूआर कोड लावण्यात येणार असून नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहनही या निमित्ताने त्यांनी केले आहे.
मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी...
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी महापालिकेच्या खरेदी प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली. शालेय वस्तूंची खरेदी आणि जेंडर बजेट अंतर्गत होणाऱ्या वस्तूंच्या वितरणासाठी केंद्र सरकारच्या जेम (Government e-Marketplace) पोर्टलचा तातडीने अवलंब करण्याची मागणी आमदार अमीत साटम यांनी केली. महापालिकेत दीर्घकाळ भ्रष्टाचार सुरु असून तो रोखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात आमदार अमीत साटम यांनी नमूद केले की, अनेक वर्षांपासून महापालिका शालेय विद्यार्थ्यांना गणवेशापासून स्टेशनरीपर्यंत २७ विविध वस्तू मोफत वाटत आहे. सध्या या वस्तू कंत्राटदारांमार्फत खरेदी केल्या जातात. अनेकदा हे कंत्राटदार उत्पादकांकडून वस्तू घेऊन महापालिकेला वाढीव दरात विकतात असे निदर्शनास आले.
आमदार अमीत साटम यांनी भाजप भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करत या २७ वस्तूंची थेट खरेदी केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून करण्याची मागणी केली. महापालिकेने शालेय वस्तू वाटण्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) चाही विचार करावा. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करावी, असे आमदार अमीत साटम यांनी म्हटले आहे.
Web Summary : Mayor Ritu Tawde donates her salary to the Mayor's Fund, urging officials to contribute for underprivileged patients' healthcare. She requests citizens donate to the fund instead of bringing bouquets. BJP demands reforms in BMC procurement to curb corruption.
Web Summary : महापौर रितु तावडे ने अपना वेतन महापौर निधि में दान किया, अधिकारियों से गरीब मरीजों के स्वास्थ्य सेवा के लिए योगदान करने का आग्रह किया। उन्होंने नागरिकों से गुलदस्ते लाने के बजाय निधि में दान करने का अनुरोध किया। भाजपा ने भ्रष्टाचार को रोकने के लिए बीएमसी खरीद में सुधार की मांग की।