मुंबई गारठली, पारा घसरला

By Admin | Updated: March 5, 2015 01:52 IST2015-03-05T01:52:03+5:302015-03-05T01:52:03+5:30

राज्यासह मुंबईला अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर आता सुटलेल्या थंड गार वाऱ्यामुळे मुंबई चांगलीच गारठली आहे.

Mumbai lost, mercury dropped | मुंबई गारठली, पारा घसरला

मुंबई गारठली, पारा घसरला

मुंबई : राज्यासह मुंबईला अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर आता सुटलेल्या थंड गार वाऱ्यामुळे मुंबई चांगलीच गारठली आहे. बुधवारी मुंबईचे किमान तापमान १४.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, हे किमान तापमान पुढील ४८ तासांपर्यंत १७ अंशावर पोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
उत्तर भारतात निर्माण झालेल्या पश्चिमी प्रकोप (वेस्टर्न डिस्टर्बन्स)मुळे मध्य भारतात म्हणजे प्रामुख्याने महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. वातावरणीय बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाढ्याच्या संपूर्ण भागात व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

मुंबईत आढळले ३९ नवे रुग्ण
मार्च महिना सुरू झाला तरी अजूनही मुंबईचे तापमान कमी झालेले नाही. मुंबईत गारवा असल्यामुळे स्वाइन फ्लूची साथ अजूनही कमी झालेली नाही. बुधवार, ४ मार्च रोजी स्वाइन फ्लूचे ३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईबाहेरून ३ नवे रुग्ण मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईबाहेरून आलेल्या तीनही रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईत आढळलेल्या ३९ नव्या स्वाइन रुग्णांपैकी १९ पुरुष असून २० महिला आहेत. १९ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू असून, १९ जणांना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. सगळ््या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट
मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात
किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, कोकण-गोव्याच्या संपूर्ण भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़

Web Title: Mumbai lost, mercury dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.