Join us

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 13, 2024 18:36 IST

Mumbai Lok Sabha Election 2024: आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार  रवींद्र वायकर यांनी सकाळी ११.४५ वाजता शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटून घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी राज ठाकरे आणि वायकर यांच्यात वैयक्तिक 10 मिनिटे चर्चा झाली.

- मनोहर कुंभेजकर मुंबई - आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार  रवींद्र वायकर यांनी सकाळी ११.४५ वाजता शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटून घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी राज ठाकरे आणि वायकर यांच्यात वैयक्तिक 10 मिनिटे चर्चा झाली.

याप्रसंगी मनसे सरचिटणीस  शालिनी ठाकरे,मनसे सरचिटणीस योगेश परुळेकर व उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे सर्व मनसेचे विभाग अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांना महायुतीचे येथील उमेदवार रवींद्र वायकर जिंकून येतील यासाठी घरोघरी जावून जोमाने प्रचार करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई उत्तर पश्चिमरवींद्र वायकरराज ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४