Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Local: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:13 IST

Mumbai Mega Block Sunday: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर पायाभूत सुविधांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या, रविवारी (८ फेब्रुवारी २०२६) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर पायाभूत सुविधांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या, रविवारी (८ फेब्रुवारी २०२६) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, काही स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे: धिम्या मार्गावर ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार (अप व डाऊन धिम्या मार्गावर) वेळ: सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंतपरिणाम: ब्लॉकच्या काळात धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.मशीद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि कुर्ला या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

पश्चिम रेल्वे: सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक

सांताक्रूझ ते गोरेगाव (अप व डाऊन धिम्या मार्गावर) वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंतपरिणाम: या ब्लॉकमुळे धिम्या मार्गावरील लोकल विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांवर थांबणार नाहीत.पर्याय: या स्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी हार्बर मार्गावरील (चर्चगेट–गोरेगाव) सेवा उपलब्ध असेल.

हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्ग: सेवांवर मोठा परिणाम

पनवेल ते वाशी (अप व डाऊन मार्ग - पोर्ट मार्ग वगळून) वेळ: सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ वाजेपर्यंतपरिणाम: पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द राहतील. पनवेल-ठाणे दरम्यानची ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे बंद असेल.

पर्याय व सुविधा

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. ठाणे–वाशी/नेरूळ दरम्यानची ट्रान्स हार्बर सेवा नियमित सुरू राहील. पोर्ट मार्गावरील रेल्वे सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Local Mega Block: Rail routes disrupted on Sunday, check schedule.

Web Summary : Mumbai local train services will be disrupted on Sunday, February 8, 2026, due to a mega block on Central, Western, and Harbour lines for maintenance. Passengers are advised to check the updated schedule before traveling.
टॅग्स :मुंबई लोकल मेगा ब्लॉकमुंबईमुंबई लोकल