लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ट्रेनमध्ये मोबाइल चोरी करून कांदिवलीतील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून चोरट्याने २ लाख ६६ हजार रुपये हडपले. याप्रकरणी चारकोप पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिरेन गोपानी (४६, रा. कांदिवली) हे दिल्ली-मुंबई प्रवासादरम्यान तेजस एक्स्प्रेसने येत असताना त्यांचा मोबाइल चोरीला गेला. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी बोरीवली रेल्वे पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या क्रमांकाचे नवीन सिमकार्ड मिळवले. मात्र, नवीन सिमकार्ड बराच वेळ सक्रिय होत नसल्याने गोपानी यांना संशय आला.
आर्थिक माहितीचा गैरवापर रक्कम लंपास
गोपानी यांनी बँकेत जाऊन खात्याची चौकशी केली. तेव्हा १ ते ६ एप्रिल या कालावधीत त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण २ लाख ६६ हजार ११९ रुपये काढले गेल्याचे समोर आले. चोरट्याने मोबाइलचा ताबा मिळवून, त्यातील आर्थिक माहितीचा गैरवापर करत ही रक्कम लंपास केली होती.
सायबर पोलिसांत तक्रार
गोपानी यांनी तातडीने आपले बँक खाते गोठवले आणि सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवली. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : A Kandivali resident lost $3,200 after his mobile was stolen on a train. The thief used the phone's financial information to transfer funds from his bank account. A police case has been registered.
Web Summary : ट्रेन में एक कांदिवली निवासी का मोबाइल चोरी हो गया, जिसके बाद उसके बैंक खाते से 2.66 लाख रुपये निकाल लिए गए। चोर ने वित्तीय जानकारी का दुरुपयोग कर पैसे उड़ा लिए। पुलिस मामला दर्ज।