Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Local Train: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 10:07 IST

Mumbai Local Train: हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल.

या सेवा विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत.  पुढे मुलुंड येथे पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. ठाणे येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि  या सेवा नाहूर, कांजूरमार्ग व  विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत.  पुढे माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.  

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  येथून वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पश्चिम रेल्वेकडून बोरिवली ते गोरेगावदरम्यान  १०. ३५ ते १५. ३५  या वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाउन जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई लोकल