Join us

मुंबईकरांनो...मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेमार्गावर फिरा बिनधास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 06:12 IST

रविवारी, ६ नोव्हेंबर रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई :

विविध दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, ६ नोव्हेंबर रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक असणार नाही.  

हार्बर रेल्वे  कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरकधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत  परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.

मध्य रेल्वे कुठे :  सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३. ५५  वाजेपर्यत परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धिम्या गाड्या  विद्याविहारपर्यंत डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील व पुढे पुन्हा डाऊन मार्गावर वळविल्या जातील, तर घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.   

टॅग्स :मुंबई लोकल