Join us

अरे या महिलांना कोणीतरी आवर घाला! पुन्हा लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, एकमेकींच्या झिंज्या उपाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:49 IST

Mumbai Local Womans Fight Video: पुन्हा एकदा लोकलमध्ये महिला प्रवाशी एकमेकींना भिडल्या.

विरार लोकलमध्ये एका महिलेला डोके फुटेपर्यंत मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा महिला प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली. हा संपूर्ण प्रकार डोंबिवली स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात घडला. या महिलांमधील हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन महिला  एकमेकींच्या झिंजा उपटत मारहाण करताना दिसत आहेत. तर, इतर महिला प्रवाशी त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार डोंबिवली स्थानकावरून आज (१ जुलै २०२५) सकाळी ८.२० वाजता सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये घडला. नेमके कशामुळे या महिलांमध्ये हाणामारी झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, जागेच्या वादावरून त्यांच्यात वाद झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे.

याआधी १७ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास विरार लोकलमध्ये जागेच्या वादातून दोन महिलांमध्ये हाणामारी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कविता मेदाडकर (वय, ३१) या विरारच्या फुलपाडा येथे जाण्यासाठी मीरारोड रेल्वे स्थानकातून लोकलमध्ये चढल्या. त्यावेळी दारात उभ्या असलेल्या ज्योती सिंग (वय,२१) हिला त्यांचा धक्का लागला आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात ज्योती हिने कविता यांच्या डोक्यात मोबाईल मारला. त्यामुळे त्याचे डोके फुटले. रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच भाईंदर स्थानकातून या दोघींना ताब्यात घेतले. एकमेकांविरोधात तक्रार न दिल्याने वसई रेल्वे पोलिसांनी केवळ स्टेशन डायरीत या घटनेची नोंद केली.

टॅग्स :व्हायरल व्हिडिओमुंबईमुंबई लोकलसोशल व्हायरल