मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर १०:५५ ते ३:५५ वाजण्यापर्यंत तर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप व डाऊन हार्बर मार्गावर ११:०५ ते ४:०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मेन लाईनवर मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या रेल्वे स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०:४८ ते ३:४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे विद्याविहार स्थानकावरून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून १०:१९ ते ३:५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल विद्याविहार आणि टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
'हार्बर'च्या गाड्या रद्द
पनवेल ते टर्मिनस जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ या वेळेत सुटणाऱ्या लोकल तसेच पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील ९:४५ ते १५:१२ या वेळेत सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील. पनवेल ते ठाणे अप ट्रान्स-हार्बरवरील ११:०२ ते ३:५३ या वेळेत सुटणाऱ्या लोकल तसेच ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बरवरील लोकल रद्द राहतील.
विशेष लोकल
ब्लॉक कालावधीत टर्मिनस आणि वाशी स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील.
Web Summary : Central Railway mega block on Sunday will affect local train services. Trains won't halt at Masjid, Sandhurst Road, Chinchpokli, and Curry Road stations. Harbour line services also face disruptions. Special locals will run between Terminus and Vashi.
Web Summary : रविवार को मध्य रेलवे पर मेगा ब्लॉक के कारण लोकल ट्रेन सेवाएं प्रभावित रहेंगी। मस्जिद, सैंडहर्स्ट रोड, चिंचपोकली और करी रोड स्टेशनों पर ट्रेनें नहीं रुकेंगी। हार्बर लाइन सेवाएं भी बाधित रहेंगी। टर्मिनस और वाशी के बीच विशेष लोकल चलेंगी।