मुंबई : उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगाने वाहू लागले असून यामध्ये आणखी वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण राज्यभरातील शहरांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५ तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सातत्याने किमान तापमान खाली उतरल्याने मुंबईकरांना माथेरानचा फील येत असल्याचे चित्र आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे काही दिवस कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार नोंदविण्यात आल्यानंतर आता डिसेंबर महिन्याच्या या काळात किमान तापमानात बऱ्यापैकी घसरण होऊ लागली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून येथून शीत वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या शीत वाऱ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक शहरांचे किमान तापमान ६ पासून १५ अंशापर्यंत नोंदविण्यात येत आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या विभागांचा समावेश असून शुक्रवारी देखील थंडीचा कडाका कायम राहील, अशी शक्यता हवामान अभ्यासाकांनी वर्तवली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारेगार झाला असून शुक्रवारी देखील थंडीचा कडाका कायम राहील. विशेषतः मध्य महाराष्ट्रामध्ये किमान तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त पुणे आणि मुंबई या शहरात देखील किमान तापमान कमीच राहील. _ कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ
राज्यातील शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येमाथेरान १७.४मुंबई १५.६परभणी १०.४छत्रपती संभाजीनगर १०.८कोल्हापूर १४.४सोलापुर १३.२डहाणू १५.२महाबळेश्वर ११.१नाशिक ८.२सातारा १०नंदुरबार १२.४नांदेड ८.८सांगली १२.३अहिल्यानगर ६.६ठाणे २०.२मालेगाव ८.८धाराशिव १०.२अकोला १०अमरावती १०.२बुलढाणा १२.२चंद्रपूर १०.८गडचिरोली १०.२गोंदिया ८नागपूर ८.१वर्धा ९.९वाशिम ११यवतमाळ १०
Web Summary : North winds plummet temperatures across Maharashtra. Mumbai felt colder than Matheran. Many cities recorded temperatures around 10 degrees Celsius. Cold wave to continue, especially in central Maharashtra, warns meteorologist Hosalikar.
Web Summary : उत्तरी हवाओं से महाराष्ट्र में तापमान गिरा। मुंबई, माथेरान से ठंडा रहा। कई शहरों में तापमान 10 डिग्री सेल्सियस के आसपास दर्ज किया गया। मौसम विज्ञानी होसालिकर ने मध्य महाराष्ट्र में ठंड जारी रहने की चेतावनी दी।