Join us

Mumbai: अडीचशे कोटींच्या उलाढालीत तुमचे किती? झवेरी बाजार निघाला झळाळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 13:34 IST

Mumbai: गणरायाला सोन्याच्या दागिन्यांचा साज चढविण्यासाठी झवेरी बाजार झळाळून निघाला आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वीच झवेरी बाजारात अडीचशे कोटींची उलाढाल झाली आहे, अशी माहिती इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि झवेरी बाजार संघटनेचे पदाधिकारी कुमार जैन यांनी सांगितले.

मुंबई - गणरायाला सोन्याच्या दागिन्यांचा साज चढविण्यासाठी झवेरी बाजार झळाळून निघाला आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वीच झवेरी बाजारात अडीचशे कोटींची उलाढाल झाली आहे, अशी माहिती इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि झवेरी बाजार संघटनेचे पदाधिकारी कुमार जैन यांनी सांगितले. दरम्यान, या अडीचशे कोटींच्या उलाढालीत आपले नेमके किती असा प्रश्न सामान्य मुंबईकाराला पडला आहे.

बाप्पासाठी, स्वतःसाठी लोकांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी सुरू केली आहे. बाप्पासाठी लागणारे अलंकार मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. बाजारात ग्राहकांची झुंबड उसळली आहे. जैन सांगतात, हलक्या वजनाच्या दागिन्यांना ग्राहक प्रतिसाद देत आहेत. यामध्ये सोन्या-चांदीच्या मोदकांसह मूर्तीची मागणी वाढत आहे. गेल्या वर्षी २०० कोटींची उलाढाल झाली होती. यावर्षी आगमनापूर्वीच अडीचशे कोटींची उलाढाल झाली आहे. यात आणखी ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 

सोन्याच्या श्री मूर्तींना मागणी ग्राहकांकडून सोन्याच्या गणेशमूर्तीची अधिक ऑर्डर येत आहे, तसेच गणपतीला लागणाऱ्या अलंकारांमध्ये जास्वंद, उंदीर मामा, केवडा, मुकुट, वरदहस्त यांना अधिक पसंती मिळत आहे.

 

टॅग्स :मुंबई