Join us  

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 3:16 PM

Bhosari land case : आजची सुनावणी काही कारणानं घेऊ न शकल्याने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे.

ठळक मुद्देआज या याचिकेवर सुनावणी काही कारणास्तव होऊ न शकल्यानने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून दिलासा कायम आहे. ८ मार्चपर्यंत हायकोर्टाकडून खडसे यांना दिलासा मिळाला आहे.

भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. आजची सुनावणी काही कारणानं घेऊ न शकल्याने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे.

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नोटीस बजावली होती. या प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात खडसेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी काही कारणास्तव होऊ न शकल्यानने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून दिलासा कायम आहे. ८ मार्चपर्यंत हायकोर्टाकडून खडसे यांना दिलासा मिळाला आहे.

 

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा, येत्या सोमवारपर्यंत ईडीकडून कठोर कारवाई नाही 

 

एकनाथ खडसे गेल्या ३० डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर होणार होते. जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली होती. लक्षणे जाणवताच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले होते. मुंबईतल्या निवासस्थानी २८ डिसेंबर आणि २९ डिसेंबर खडसेंनी आराम केला. मात्र, कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. या चाचणीदरम्यान त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर खडसेंनी ईडीकडे चौकशीला हजर राहण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी मागितला होता. खडसेंनी ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता हजेरी लावली आणि सायंकाळी ५.३० वाजता कार्यालय सोडले होते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात येऊन पोहचले आहे. 

टॅग्स :उच्च न्यायालयएकनाथ खडसेभोसरीअंमलबजावणी संचालनालय