उन्हाळ्यापूर्वीच मुंबई तापली; मुंबई ३७ तर ठाणे ४० अंश

By सचिन लुंगसे | Published: February 29, 2024 06:58 PM2024-02-29T18:58:54+5:302024-02-29T18:59:05+5:30

मुंबईच्या समुद्रावरून वाहणा-या वा-यामुळे मुंबईचे तापमान नियंत्रित राहते.

Mumbai heats up before summer; Mumbai 37 degrees and Thane 40 degrees | उन्हाळ्यापूर्वीच मुंबई तापली; मुंबई ३७ तर ठाणे ४० अंश

उन्हाळ्यापूर्वीच मुंबई तापली; मुंबई ३७ तर ठाणे ४० अंश

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील बहुतांशी ठिकाणी गुरुवारी कमाल तापमान ४० अंश नोंदविण्यात आले असून, वाढत्या कमाल तापमानाने मुंबईकरांची लाही लाही केली आहे. विशेषत: सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान पडणारे ऊनं नागरिकांना चटके  देत असून, ही उन्हाळ्याची सुरुवात असेल तर उन्हाळा कसा असेल ? याची कल्पनाच न केलेली बरी...अशा प्रतिक्रिया मुंबईकरांनी वाढत्या तापमानावर दिल्या आहेत.

मुंबईच्या समुद्रावरून वाहणा-या वा-यामुळे मुंबईचे तापमान नियंत्रित राहते. मात्र सध्या पूर्वेकडून समुद्राकडे वारे वाहत आहेत. हे वारे समुद्रावरील वा-याला थोपावत आहेत. समुद्रावरून वारे वाहत नसल्याने तापमानात वाढ नोंदविली जात असून, शुक्रवारी मात्र या तापमानात घट होईल. मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशावरून ३२ नोंदविण्यात येईल, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली.

आयएमडी, स्थानिक स्तरावरील ऑटोमेटीक वेदर स्टेशनकडून प्राप्त माहितीनुसार, वेगरिज ऑफ दी वेदरने खालील तापमाने दिली आहेत.

कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये...
मुंबई ३७.२
ठाणे ४०
रत्नागिरी ३८
चिपळूण ४१
कल्याण ४०
पनवेल ३९
मीरा रोड ३९
नवी मुंबई ३८
विरार ३८
कर्जत ४१
बदलापूर ४०
मुंब्रा ३९
वाशी ३८

Web Title: Mumbai heats up before summer; Mumbai 37 degrees and Thane 40 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.