Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा: निसर्ग रागावला, आता माणसाने शहाणपणाने वागावे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:09 IST

२३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाल्याची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो.

मुंबई :

२३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाल्याची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो. हवामान बदलाच्या आव्हानांविषयी जागृती करणे आणि मानवी सुरक्षिततेसाठी वातावरणीय विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

२०२६ ची थीम 'आजचे निरीक्षण, उद्याचे रक्षण' अशी आहे. हा दिवस नैसर्गिक आपत्तींचा अंदाज वर्तवण्यामध्ये आणि हवामान बदलाच्या गंभीर परिणामांबद्दल (पूर, दुष्काळ, उष्णतेची लाट) समाजात जागरूकता निर्माण करतो. निसर्ग रागावला असून आता मानवाने शहाणे होणे गरजेचे आहे.

'आजचे निरीक्षण, उद्याचे रक्षण'तापमान वाढीमुळे हवामानात बदल होऊन उष्ण लहरीत वाढ, अति पाऊस, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्याच्या दिशेवर विपरीत परिणाम होणार आहे. मुंबई हे शहर समुद्र किनारी असल्याने तिथे दमट हवामान असते.

खूप थंडी किंवा खूप उष्णता तिथे नसावी, असे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या दोन दशकातील मुंबईचे बदलत चाललेले हवामान, पाऊस आणि तापमान पाहता भविष्यात ही धोक्याची घंटा समजली पाहिजे.

तापमानाचा पारा : वर्षागणिक वाढतावर्ष    तापमान२०११ >>    ४१.३२०१२     >> ३९.५२०१३     >> ४०.५२०१४     >> ३८२०१५     >> ४०.८२०१६     >> ३६.९२०१७  >>    ३८.४२०१८     >> ४१२०१९     >> ४०.३२०२०     >> ३७.३२०२१     >> ४०.९२०२२     >> ३९.६२०२३     >> ३९.४

 

२००० पासून उष्ण लहरीचे प्रमाण वाढत आहे.

२०१० ते २०२२ हे सर्वाधिक तापमानाचे वर्ष ठरले.

२०१६ आणि २०२२ हे उष्ण लहरीचे वर्ष ठरले.

कुलाबा येथील १९९१-२०२० काळातील वार्षिक सर्वाधिक तापमान आकडेवारी पाहिल्यास मुंबईच्या हवामान बदलाची गंभीरता लक्षात येते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Climate change: Nature's warning; humans must act wisely now!

Web Summary : World Meteorological Day highlights climate change impacts. Mumbai's rising temperatures and extreme weather events signal a dangerous trend. Observations are key to future protection, demanding immediate action to mitigate climate risks.
टॅग्स :तापमानमुंबई