Join us

मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 04:30 IST

तब्बल ३ हजार ६८७ मिमी बरसला; देशातही सरासरीपेक्षा अधिक कोसळला

मुंबई : सांताक्रुझ येथील वेधशाळेत संपूर्ण मान्सूनच्या काळात २ हजार २०६ मिमी पावसाची नोंद होते. या वर्षी दुप्पट पाऊस झाला असून, ही नोंद तब्बल ३ हजार ६८७ आहे.यंदा दोन-चार वेळा पावसाने प्रलयंकारी रूप घेतल्याने भरलेली धडकी आणि मुंबईला लागून गेलेले निसर्ग चक्रीवादळ मुंबईकरांच्या कायम लक्षात राहील.मान्सून या वर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. यापूर्वी २०१३ साली तो केरळमध्ये १ जून रोजी दाखल झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी मान्सून देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळला. या वर्षी ही नोंद १०९ टक्के आहे तर २०१९ साली ती ११० टक्के होती. तत्पूर्वी सलग दोन वर्षे सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस १९५८ आणि १९५९ साली नोंदविण्यात आला होता. जुलैमध्ये अधिक पावसाची नोंद होते. या वर्षी मात्र जुलैमध्ये सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत कमी पाऊस झाला. मात्र पावसाची कामगिरी समाधानकारक आहे. गेल्या चार दशकांच्या तुलनेत आॅगस्टमध्ये सर्वाधिक २७ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली.मुंबई आणि पाऊस १९९३ ते २०२० दरम्यानच्यानोंदी (मिलीमीटरमध्ये)२३ सप्टेंबर १९९३ : ३१२.४४ सप्टेंबर २०१२ : १८५.३२० सप्टेंबर २०१७ : ३०३.७५ सप्टेंबर २०१९ : २४२.२२३ सप्टेंबर २०२० : २८६.४या वर्षीचा मोठा पाऊस (मिमी)३-४ जुलै : १५७४-५ जुलै : २००.८१४-१५ जुलै : १९१.२३-४ आॅगस्ट : २६८.६२२-२३ सप्टेंबर : २८६.४या वर्षीचा महिन्यानुसार पाऊस (मिमी)जून : ३९५, जुलै : १५०२,आॅगस्ट : १२४०, सप्टेंबर : ५२८