मुंबई पदवीधर निवडणुकीत डॉ. दीपक सावंत करणार किरण शेलार यांचा प्रचार
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 19, 2024 14:40 IST2024-06-19T14:40:08+5:302024-06-19T14:40:37+5:30
डॉ. सावंत हे सुद्धा या निवडणुकीत शिंदे सेनेतून इच्छुक होते.

मुंबई पदवीधर निवडणुकीत डॉ. दीपक सावंत करणार किरण शेलार यांचा प्रचार
मुंबई : येत्या दि. २६ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाची महत्वाची निवडणूक होणार आहे. शिंदे सेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे महायुतीचे उमेदवार किरण शेलार यांचा प्रचार करणार आहेत.
डॉ.सावंत हे सुद्धा या निवडणुकीत शिंदे सेनेतून इच्छुक होते. त्यांनी सुद्धा गेली १० महिने पदवीधर मतदारांची चांगली नोंदणी केली होती. मात्र त्यांनी अखेरच्या क्षणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आपला अर्ज मागे घेतला होता.
काल शेलार यांनी डॉ. दीपक सावंत यांची त्यांच्या अंधेरी पूर्व, कोलडोंगरी कार्यालयात भेट घेतली. यावेळी मुंबईत विभागवार बैठका घेण्याचे आणि शेलार यांना निवडणून आणण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तर आपल्याला पदवीधर निवडणूकीचा अनुभव असून त्यांचा मला निश्चित फायदा होईल असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.