Join us

"तो" मोकळा वेळ ठरला आयुष्याचा शेवट...; नाशिकच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By मनीषा म्हात्रे | Updated: December 19, 2024 04:43 IST

नाशिकच्या पिंपळगाव येथून हे दाम्पत्य अंधेरीतील रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी आले होते.

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचारासाठी आलेल्या अहिरे कुटुंबीयांनी दुपारच्या मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्याचा प्लॅन केला. तोच त्यांचा आयुष्याचा अखेर ठरला. सगळे जण आनंदात अचानक नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. 

नाशिकच्या पिंपळगाव येथून हे दाम्पत्य अंधेरीतील रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी आले होते. या घटनेने अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुपारचा मोकळा वेळ असल्याने त्यांनी एलिफंटा लेणीला जाण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे लहान बाळासह बोटीने प्रवास सुरू झाला. मात्र हा प्रवास त्यांचा शेवटचा असेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यांचा अहिरे यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :मुंबईअपघात