Join us

Mumbai: कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग! सुदैवाने जीवितहानी नाही  

By रतींद्र नाईक | Updated: August 17, 2023 22:08 IST

Mumbai News: कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गाळ्यांना आग लागल्याची घटना    गुरुवारी रात्री घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीमुळे गाळे जळून खाक झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

- रतिंद्र नाईकमुंबई - कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गाळ्यांना आग लागल्याची घटना    गुरुवारी रात्री घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीमुळे गाळे जळून खाक झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

कुर्ला पश्चिम एलबीएस मार्ग येथे कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेट असून तळ अधिक दोन मजली इमारतीतील गाळ्यांना रात्री सव्वा आठच्या सुमारास आग लागली. या आगीची घटना घडताच इमारत रिकामी करण्यात आली. स्थानिकांनी अग्निशमन दलाला आगीची वर्दी दिली. काही क्षणातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवण्यास सुरुवात केली. जम्बो टँकर्स, अग्निशमन बंब अशा पाच वाहनांच्या मदतीने ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.

टॅग्स :मुंबईआग