मुंबई : "मालवणी पोलीसांच्या सतर्कतेमुळेच फार मोठी दुर्घटना ठळली"

By मनोहर कुंभेजकर | Updated: March 31, 2023 16:19 IST2023-03-31T16:19:19+5:302023-03-31T16:19:47+5:30

मालवणी प्रकरणावर आमदार अस्लम शेख यांची प्रतिक्रिया

Mumbai Due to the vigilance of the Malvani police a very big accident happened aslam sheikh ram navami | मुंबई : "मालवणी पोलीसांच्या सतर्कतेमुळेच फार मोठी दुर्घटना ठळली"

मुंबई : "मालवणी पोलीसांच्या सतर्कतेमुळेच फार मोठी दुर्घटना ठळली"

मुंबई : मालवणी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळेच फार मोठी दुर्घटना टळली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम मालवणी पोलिसांनी केलं आहे, अशा शब्दांत मालाड पश्चिम विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी पोलीसांचं कौतुक केलं आहे.

काल राम नवमी मिरवणूूकी दरम्यान दोन गटांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अस्लम शेख बोलत होते.

पोलिसांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. दंगेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आजच्या तारखेला कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. सीसीटीवी फुटेज पडताळल्या नंतरच यामागचं सत्य समोर येईल. ज्यांनी कोणी चुकीचं काम केलं असेल त्यांच्यावर कारवाई होईलच, असे अस्लम शेख म्हणाले.

Web Title: Mumbai Due to the vigilance of the Malvani police a very big accident happened aslam sheikh ram navami

टॅग्स :Mumbaiमुंबई