मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५६५ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST2021-02-05T04:32:31+5:302021-02-05T04:32:31+5:30

मुंबई : मुंबईत मंगळवारी ४५५ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत दोन लाख ९१ हजार ८२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

In Mumbai, the doubling period is 565 days | मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५६५ दिवसांवर

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५६५ दिवसांवर

मुंबई : मुंबईत मंगळवारी ४५५ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत दोन लाख ९१ हजार ८२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५६५ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ५,५२८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २८ लाख २९ हजार १५६ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ३३४ रुग्ण आणि ७ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, बाधितांची एकूण संख्या तीन लाख नऊ हजार ६३१ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ३६६ झाला आहे. मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १८२ असून, दोन हजार ८५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने दोन हजार ४८६ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.

Web Title: In Mumbai, the doubling period is 565 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.