मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली दोनदा धावणारी राजधानी एक्सप्रेस आता आठवड्यातून चार वेळा धावणार आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राजधानी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून राजधानी एक्सप्रेस सुटणार आहे.
आज खार रोड, विलेपार्ले येथील पादचारी पूल, लोअर परळ येथील सरकत्या जिन्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच हार्बर मार्गावरील चेंबूर आणि डॉकयार्ड रोड ग्रीन स्थानक म्हणून घोषित करण्यात आले. २२ रेल्वे स्थानकावर एलइडी इंडिकेटर, १३ स्थानकांचे छत आणि फलाटाची दुरूस्ती, सीएसएमटी स्थानकावर फलाट क्रमांक १४ ते १८ नवीन प्रवासी कॉरिडॉर, परळ स्थानकातील सरकते जिने आणि लिफ्ट, गोवंडी, घाटकोपर स्थानकात नवीन तिकीट घर, सीएसएमटी, भायखळा स्थानकात ३ मोठे पंख्यांचे उद्घाटन करण्यात आले.