Join us  

Mumbai CST Bridge Collapse: स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाईची हकालपट्टी, काळ्या यादीत टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 6:35 AM

दोन अभियंत्यांचे निलंबन; ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस

मुंबई : गेल्या वर्षभरातील तीन पूल दुर्घटनांबाबत संपूर्ण मुंबईत संताप व्यक्त होत आहे. अशा दुर्घटनांसाठी जबाबदार कोण, असा उद्विग्न सवाल सर्वत्र विचारला जात असल्याने प्रशासनाची झोप उडाली. हिमालय पादचारी पूल दुर्घटनेची २४ तासांच्या आत चौकशी करून पालिका अधिकारी, ठेकेदार, स्ट्रक्चरल ऑडिटर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर हा पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाईची शासकीय पॅनलवरून हकालपट्टी करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या दुर्घटनेने मुंबईतील सर्व पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे सर्व पुलांची फेरतपासणी होणार आहे.गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाला जोडणारा हिमालय हा पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत सहा पादचाऱ्यांचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले. सुरक्षित जाहीर करण्यात आलेला पूल कोसळल्यामुळे सर्वत्र संताप व असुरक्षिततेची भावना पसरली. याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळपर्यंत या दुर्घटनेला जबाबदार कोण, हे ठरविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त (दक्षता) विवेक मोरे यांना चौकशीचे आदेश दिले होते.या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल मोरे यांनी आज संध्यकाळी आयुक्तांकडे सादर केला. त्यानंतर आयुक्तांनी तत्काळ कारवाई करीत या पुलाच्या ऑडिटचे देखरेख करणाºया अधिकाºयाचे निलंबन, कार्यकारी अभियंत्याची खातेनिहाय चौकशी, पूल विभागाच्या सेवानिवृत्त दोन अधिकाऱ्यांची चौकशी आणि ठेकेदार व स्ट्रक्चरल ऑडिटर यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.स्ट्रक्चरल ऑडिटर देसाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्यांना दिलेला कामाचा मोबदला वसूल करण्यात येणार आहे. कारणे दाखवा नोटीस पाठवून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तसेच यापुढे या कंपनीला कोणत्याही पुलाच्या ऑडिटचे काम दिले जाणार नाही. त्यांचे काम तत्काळ थांबवून त्यांनी ऑडिट केलेल्या व करीत असलेल्या पुलांचे दुसºया स्ट्रक्चर ऑडिटरमार्फत ऑडिट करण्यात येणार आहे. महापालिकेने २९ ऑगस्ट २०१६ मध्ये मुंबईतील सर्व पुलांचे ऑडिट केले होते. मात्र या दुर्घटनेने या सर्व ऑडिटबाबत शंका व्यक्त होत असल्याने पुन्हा एकदा सर्व पुलांचे ऑडिट होणार आहे.यांच्यावर झाली कारवाई१. ए.आर. पाटील, कार्यकारी अभियंता - निलंबन२. एस. एफ. काकुळते, सहायक अभियंता - निलंबन३. ए. आय. इंजिनीअर, कार्यकारी अभियंता - चौकशी४. एस. कोरी, सेवानिवृत्त, - सखोलमुख्य अभियंता, पूल विभाग चौकशी५. आर.बी. तरे, सेवानिवृत्त उपमुख्य अभियंता - सखोल चौकशीकारणे दाखवा नोटीसआर.पी.एस. इन्फ्रास्ट्रक्चर, ठेकेदारकाळ्या यादीत टाकलेडी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनीअरिंग कन्सलटंट अ‍ॅण्ड अ‍ॅनलिस्टपुलाचे बांधकाम १९८४-८६कोणी केली दुरुस्ती?२०१२-२०१४ या काळात आर.पी.एस. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.कोणी केले ऑडिट?डी. डी. देसाई असोसिएटेड इंजिनीअरिंग कन्सलटंट अ‍ॅण्ड अ‍ॅनलिस्टकधी केले ऑडिट?पहिली पाहणी - २६.१२.२०१६दुसरी पाहणी - ०४.०७.२०१७अहवाल सादर - १३.०८.२०१८

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना