Join us  

Mumbai CST Bridge Collapse : मुंबईतील १५७ पुलांचे पुन्हा ऑडिट करा; पालिकेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 6:00 PM

१५७ मुंबईतील पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. 

ठळक मुद्दे या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईतील १५७ पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याचे आदेश स्ट्रक्चरल ऑडिट कंपन्यांना दिले आहेत.  कालच या दुर्घटनेला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेरील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा मुंबईकरांचा नाहक बळी गेला. मात्र, या दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांच्या राजकरणाने देखील जोर धरला आहे. बृहन्मुंबई महापालिकेने हा पूल आमच्या अखत्यारीत असल्याचं स्पष्ट केलं असून कालच या दुर्घटनेला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईतील १५७ पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याचे आदेश स्ट्रक्चरल ऑडिट कंपन्यांना दिले आहेत. 

सर्व स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपन्यांना याबाबत पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. १५७ मुंबईतील पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. 

Mumbai CST Bridge Collapse : युनायटेड काँग्रेसने केले आयुक्तांना लक्ष्य; महापालिकेसमोर आंदोलन

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूलसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनानगर पालिका