हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईच्या क्रिकेटपटूचे मैदानावरच निधन
By Admin | Updated: December 10, 2014 10:30 IST2014-12-10T10:29:48+5:302014-12-10T10:30:07+5:30
हृदयविकाराच्या झटक्याने एका क्रिकेटपटूचा मुंबईतील मैदानावरच मृत्यू झाला.

हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईच्या क्रिकेटपटूचे मैदानावरच निधन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - एका स्थानिक सामन्यादरम्यान बाऊंसर लागून ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्युजचे निधन झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही असाच एक दुर्दैवी प्रकार घडला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने एका क्रिकेटपटूचा मैदानावरच मृत्यू झाला आहे. रत्नाकर मोरे असे मृत्यूमुखी पडलेल्या क्रिकेटपटूचे नाव असून तो टाटा पॉवर संघातील यष्टीरक्षक होता.
ओव्हल मैदानात टाटा स्पोर्ट्स क्लबच्या स्पर्धेतील सामन्यादरम्यान मोरे याला अस्वस्थ वाटू लागले व टक्कर येऊन तो मैदानातच खाली कोसळला. उपचारांसाठी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्याचे निधन झाले.