मुंबईत पुन्हा हिंदी- मराठी भाषेचा वाद दिसून आला. भांडुप परिसरात राहणाऱ्या जोडऱ्याने डोमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयला मराठी येत नसल्याने पैसे देण्यास नकार दिला. हा संपूर्ण प्रकार डिलिव्हरी बॉयने आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
मुंबईतील भांडुप परिसरातील साई राधे नावाच्या इमारतीत हा प्रकार घडला. या इमारतीत राहणाऱ्या एका जोडप्याने डोमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयला मराठी येत नसल्याने नकार दिला. पैसे हवे असतील तर तुला मराठीतच बोलावे लागेल, असा जोडप्याने हट्ट धरला. त्यानंतर डिलिव्हरी बॉयला पैसे न घेता परत जावे लागले. डिलिव्हरी बॉयने संपूर्ण घटना त्याच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.