Join us

Mumbai Corona Updates: मुंबईचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढतोय! आज ८०९ रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 20:10 IST

Mumbai Corona Updates: देशात ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना आता मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या देखील चिंतादायक ठरत आहे.

Mumbai Corona Updates: देशात ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना आता मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या देखील चिंतादायक ठरत आहे. मुंबईत आज ८०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ३३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

मुंबईत कोरोना रुग्णांचं बरं होण्याचा दर ९७ टक्के इतका असून शहरात सध्या ४७६५ सक्रीय रुग्ण आहेत. रुग्णदुपटीचा काळ ९६७ दिवस असून रुग्णवाढीचा दर ०.७ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबईत आज एकूण ४३,३८३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. मुंबईत सध्या एकच कन्टेनमेंट झोन असून एकूण २९ इमारती सील आहेत. 

मुंबईत डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. १४ डिसेंबर रोजी मुंबईत २२५ रुग्ण आढळून आले होते. तर २३ डिसेंबर रोजी हाच आकडा ६०० पर्यंत पोहोचला. २६ डिसेंबर रोजी ९२२ रुग्ण आढळून आले होते. तर आज ८०६ रुग्णांची नोंद झाली आहे. 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या