Join us  

अमिताभ, अक्षय आणि अनुपम खैर आता काय इलेक्ट्रीक कार चालवतात का?, काँग्रेसचा उपरोधिक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 1:54 PM

fuel price hike : मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींना लगावला टोला.

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी लगावला आहे. (mumbai congress chief bhai jagtap attacks bollywood celebrities over fuel price hike)

देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शंभरीकडे वाटचाल सुरू असताना हे कलाकार शांत का?  असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. भाई जगताप यांनी बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खैर यांनी २०१२ साली केलेल्या ट्विटची आठवण करुन दिली आहे. केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी रामायणाचा दाखल देत गाड्या कॅशमध्ये करता येतील पण पेट्रोलसाठी कर्ज काढावं लागेल असं म्हटलं होतं. तर अक्षय कुमारने आता सायकल चालवण्याची वेळ आली आहे असं म्हटलं होतं. यासोबतच अनुपम खैर यांनी एक विनोद ट्विट करत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन काँग्रेस सरकारची खिल्ली उडवली होती. 

भाई जगताप यांनी या सेलिब्रिटींची जुने ट्विट्स शेअर करुन त्यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर बोलणारे आज शांत का? असा सवाल केला आहे. "अमिताभ यांनी २०१२ साली पेट्रोल ६० रुपयांवर गेलं तेव्हा रामायणाचा दाखल देत काँग्रेस सरकारवर टीका केली होती. आता पेट्रोल शंभरी गाठतंय मग आता हे सेलिब्रिटी गप्प का? त्यांनी आता काय इलेक्ट्रीक कार घेतल्यात का?", असं भाई जगताप म्हणाले आहेत. 

टॅग्स :अशोक जगतापअमिताभ बच्चनअक्षय कुमारअनुपम खेरपेट्रोल